गुढी पाडव्याची सुट्टी असल्यामुळे घरी इचलकरंजी ला गेले होते. शुक्रवारी पोहोचले, आता शुक्रवार असल्यामुळे आई, बाबा ऑफिसला गेलेले, भाऊ कॉलेजला. त्यामुळे घरी मी, आज्जी आणि आजोबा. इचलकरंजी ला ६ तास भारनियमन आहे. त्यामुळे टिव्ही, कॉम्पुटर यांचा काहि उपयोग नाहि. मग मी आणि आज्जी दोघींनी खूप गप्पा मारल्या. आज्जी नं 'या सुखानो या', 'गोजीरवाण्या घरात' ची स्टोरी सांगितली ( मी लहान असताना आज्जी मला छान गोष्टि सांगत असे, आज काल मराठी सिरियल च्या स्टोरी सांगते.) आज्जी झोपल्यानंतर 'काय करायचं?' हा प्रश्न उभा. दुपारी झोपायची सवय नाहि. काय करायचं असा विचार करत घरभर फिरले. टळटळीत दुपार त्यामुळे बाहेर फिरयला जाणे नाहि, मग पुस्तक - ओहो आई नं लायब्ररीतून् आणलेली मासिकं झालियेत वाचून. 'काय करावे काहि सुचेना बाई' हि एका बडबड गीतातील ओळ म्हणत फिरत होते घरात. मला 'पुढारी' वाचयला आवडत नाहि, आणि 'लोकसत्ता' आणायला S.T. Stand पर्यंत कोण जाणार? जाऊ दे, असा विचार करत करत भावाच्या अभ्यासाच्या कपाटा जवळ आले, तिथे S/W engg, graphics हि पुस्तके, ती पण नको. MCA ला वाचली खूप झालं. तिथं मला सातवीत असणार्या माझ्या चुलत भावाचं मराठीचं पुस्तक सापडलं.
वाह ठिक आहे मराठीचं पुस्तक सही काहितरी वाचायला मिळलं. पुस्तक वाचताना मला माझा सहावी चा मराठीचा पेपर आठवला. पेपर मध्ये अभ्यासक्रमाच्या बाहेरील एक कविता होती आणि त्यावर पश्न विचारले होते. त्यातला एक प्रश्न चांगला लक्षात राहिला तो होता :
देणार्याने देत जावे, घेणार्याने घेत जावे
घेता घेता घेणार्याने, देणार्याचे हात घ्यावेत
या ओळींचा अर्थ स्पष्ट करा.
मग मी लिहुन आले देणार्याने देत रहावे घेणार्याने घेत रहावे आणि देणार्याचं सगळं देऊन संपलं तर घेणार्याने त्याचे हातच काढुन घ्यावेत. पेपर झाल्यावर घरी आले, आईनं विचारलं काय लिहिलंस या प्रश्नाचं उत्तर, मग झोपळ्यावर झुलत झुलत जे लिहिलं ते सांगितलं. आई हसली आणि जरासुद्धा न रागावता तीने मला पूर्ण कविता समजावून सांगितली. यावर माझा भाबडा प्रश्न असा होता, आई, हे लोक सरळ, सरळ का गं नाही सांगत, कि घेणार्यानं घेता घेता देणार्या सारखं द्यायला शिकावं.
तर सांगत होते एक आणि भरकटले दुसरीकडे. कुठे होते मी, हां तर सातवीचं पुस्तक वाचत होते. मी एक छान कविता वाचली. ती कविता मी सातवी मध्ये असताना सुद्धा वाचली होती, पण असं वाटलं की मला नव्याने ती कविता समजली.
रे तुझीया सामर्थ्याने ढळतील दिशा हि दाही,
मी फुल तृणातील इवले उमलणार तरीहि नाही
शक्तीने तुझीया दिपुनी, तुज करतील सारे मुजरे,
पण सांग कसे उमलावे, ओठातील गाणे हसरे
जिंकिल मला दवबिंदु, जिंकिल तृणातील पाते,
अन स्वताःस विसरून वारा, जोडील रेशमी नाते
कुरवाळीत येतील मजला, श्रावणातल्या जळधारा
सळ्ऽसळून भिजली पाने, करतील मज सजल इशारा
रे तुझीया सामर्थ्याने, मी मला कसे विसरावे
रंगाचे अन्ऽ गंधाचे, मी गीत कसे गुंफावे
शोधीत धुक्यातूनी मजला, दवबिंदू होऊनी ये तु
जणु भिजलेल्या मातीचा, सजल सुगंधीत हेतू
तु तुलाच विसरून यावे, मी तुझ्यात मज विसरावे
तु हसत मला फुलवावे, मी नकळत आणि फुलावे
या कवितेच्या कवींच नाव लक्षात नाहि राहिलं :( आता सातवीच्या पुस्तकात पाहून सांगते. मी सातवी मध्ये असताना या कवितेला 'हट्टी फुलाची कविता' असं म्हणायचे. कविता खुपच छान आहे. पण मला खरं सांगा, खरचं ही कविता सातवीच्या मुलांना समजण्यासारखी आहे का?
Monday, April 14, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
19 comments:
आई, हे लोक सरळ, सरळ का गं नाही सांगत, कि घेणार्यानं घेता घेता देणार्या सारखं द्यायला शिकावं.
lol, nice blog, keep writing! mala utsukata aahe ya kawiteche kawi kon aahet te!
Kaviteche naav:
Mi Ful Trunaatil Evle
Kavitasangraha- Gypsy
Mangesh Padgaonkar
Kavita 7th chya mulaanna samajanyaasaarkhi nahi.
I was enjoying my summer vacation after 12th board exams when I re-read that book. Then after a month or so I met our teacher who used to teach English at school. I told her that I had liked the book. (Most of the poems there are about nature.) And then I told her that even though I didn't think I understood this particular poem I liked it immensely. Then she took out the book from her shelf and 'taught' me the poem. The incident is some 11 years old. But I still vaguely remember the thrill. :)
Hello, nice to see your blog! Hatti nahi te phool ti kavita Self-Respect baddal aahe.
खरचं ही कविता सातवीच्या मुलांना समजण्यासारखी आहे का?
=> या संदर्भात मला पुर्वीच्या पाठ्य पुस्तकातील एका कथेची आठवण झाली. इयत्ता चौथीच्या पाठ्य पुस्तकात असणार्या या कथेचे नाव होते "दुधावरची साय". एक आज्जी आणि तिची शांती नावाची नात यांच्या मधले अतूट नाते सांगणारी ही एक प्रसिद्ध कथा आहे. विलक्षण बाब अशी की त्याच काळात बी.ए. (मराठी) ला पण हीच कथा होती. पण फरक असा होता, की
चौथीच्या मुलाना प्रश्न विचारला जात असे:
आज्जी शांतीला जवळ घेऊन काय म्हणाली?
आणि बी.ए. च्या विद्यर्थ्यांसाठी प्रश्न होता:
आज्जी शांतीला जवळ घेऊन "दुधापेक्षा दुधावरच्या सायीलाच जास्त जपावे लागते" असे का म्हणाली?
sunder lihala aahe bload....
Chanach aahe kavita, pan 7th chya mulanna sajayala awaghad aahe.Keep writing.
wow mi tuze sarv blog wachalet. Tyat bhitri bhagu ani mee phool trunatil evale! khupach chhan hote. Tu lalit lekhan ka karat nahis. Maza chhapkhana asayala hava hota. Mich publish kele aste.
ते आज्जीला सिरियलची गोष्ट सांगण्याची गोष्ट म्हणजे धमाल वात्रटपणाच.
या सिरियलच्या गोष्टी म्हणजे खरेतर एरवीही लोककहाण्यांच्याच वळणाने जातात.
असो.
छान लेख.
यात लिहिलेलं सगळं 'आपलसं' वाटलं. किती साम्यं असू शकतात आठवणींमध्ये....
hi....
I realy love this poem too much...thank you so much...
I agree with u this poem is not for 7th std student...but I think thats why we have teachers...
when I was in 7th std..that time I woulden't be able to learn this poem if my teacher Mis. Angha Joshi mam didn't teach me this very nicely...after I learn this i make its tune on... Ae mere watan ke logo....and because of that still I remember this poem word to word...
I would like to say thanks to you and my teacher and ofcorse the poeat Mangesh Padgaonkar
...for nice poeam...
hi kavita sahavichya pustakat hoti.. mangesh padgaonkaranchi ahe.. pustakat sandarbh lihitana mhatale ahe.. " swatacha badejav visarun koni maitricha hat puthe kela tarach tyachyashi saukhya jodave "
majhi Fav, Kavita....
Mi 7th nantar kiti tri varsh te book japun thevale hote........
haha..khare aahe aapale..jevha..mi dekhil, denaryane det jave....hi kavita pratham vachali tvha haach arth kadhala hota....chan lihile aahet...Aapan.
hey,
thanks Sumedha!!!
I was reading another poem of Kusumagraj and realized somewhere these four lines were stuck in my head along with the blue flower print of "Balbharti" :)
and found the whole poem here!!!!
I was just wondering whose poem is it n read Atul's comment!
thanks too both u ppl as my mind is @ peace now :)
loved reading this blog too!!
a very genuine writing i must say :)
लहानपणा पासून माझी हि आवडती कविता, गाताना खूप गर्वाने गावी अशी हि कविता आहे,
सहज आठवण झाली 4 ओळींच्या वर आठवत नव्हती , गूगल केलं अन सहज मिळाली,, खूप आनंद झाला,,
आता मी रेकॉर्ड करतोय, माझ्या आवाजात विद बँकग्राऊंड मुसिक ,
आभारी,,
kharch khup mast aahe hi poem karan satvil astana mi hila class room made chal lavli hoti aajhi hi poem majya votavar aahe lahan paniche divas khup sundar astat
Mi khup diwsapasun hi Kavita shodhat Hoto... Hi satat mazhya tondat rengalaychi pn purn athavat nhavti. Shalet vachali Hoti evdhach lakshat Hot pn kitvit te pn lakshat nhavt...
Aaj jaun mazha ha shodh kuthe thambla.
Really thanks a lot for sharing it.!
And nice blog keep writing. All the Best...
me khup jast kavita shodhali
thanks alot
hya sobat asleli ajun 1 kavita hoti 'Ghananil sagracha ghannad yet kani' ti kavita pan chhan ahe
Post a Comment